गंजगोलाई भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपायुक्तांची पाहणी
लातूर(२9),प्रतिनिधी : लातूर मनपा उपायुक्त श्रीमती वसुधा फड यांनी गंजगोलाई भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने गंजगोलाई भागात पार्किंग, ऑटोरिक्षा थांबा, एकेरी वाहतूक रस्ते करणे बाबत पाहणी केली.
या पाहणी मध्ये वाहतूक पोलीस उपनिरीक्षक, श्री.बाबूराव गित्ते, शहर अभियंता श्रीमती उषा काकडे, क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी,रवि कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक,शहर अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधव,अतिक्रमण प्रमुख संतोष रणदिवे उपस्थित होते.
