डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 134 व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून अभिवादन !
लातूर (६), प्रतिनिधी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे आज आंबेडकर चौक व आंबेडकर पार्क येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सन्मानपूर्वक अभिवादन करण्यात आले. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यांना नवीन उंची देण्याचा संकल्प सर्वांनी एकमुखाने व्यक्त केला. समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, “बाबासाहेबांचे विचार हे फक्त भूतकाळातील स्मृती नसून वर्तमान व भविष्यासाठी मार्गदर्शक आहेत. संविधानातील मूल्यांचे जतन करणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे.”
जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांनी महापरिनिर्वाण दिन पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची घोषणाही केली आहे, ज्यात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, संविधान साक्षरता मोहीम, तसेच वंचित समाजघटकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचा समावेश आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
बाबासाहेबांच्याप्रति आदर भाव व्यक्त करण्यासाठी समितीच्या वतीने केलेल्या आवाहनाला दाद देत वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे, चंद्रकांत चिकटे,मोहन माने,अशोकराव गोविंदपुरकर, ॲड.किरण जाधव, प्रा.संजय गवई, आदींनी आदरांजली वाहिली. अनेकांनी आपल्या भाषणातून आंबेडकवादयांनी विविध संकल्प करुन बाबासाहेबांचे कार्य जोमाने पुढे घेऊन जाणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी शांतता व समतेच्या संदेशासह डॉ. आंबेडकरांना सादर विनम्र अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याप्रती नव्याने निष्ठा व्यक्त केली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा.अनंत लांडगे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष हिराचंद गायकवाड, माजी जिल्हा सरचिटणीस अशोक शिंदे, धम्मदीक्षा समिती प्रमुख राहुल गायकवाड, उपप्रमुख सदानंद कापूरे, डॉ. विजय अजनीकर, सुजाता अजनीकर, बौद्धाचार्य ज्ञानोबा इंगळे गुरुजी, डी. पी. भोसले, देवदत्त बनसोडे, शत्रुघ्न भोसले, प्रसनजीत जोगदंड, लक्ष्मण कांबळे, हणमंत कांबळे, भीमराव करवंजे, रमेश श्रृंगारे, अशोक कांबळे, किशोर कांबळे, जगन्नाथ धुळे, विजय श्रृंगारे, ॲड. रोहित सोमवंशी, सचिन गायकवाड, केशव कांबळे, विनय जाकते, राहुल कांबळे, सिद्धांत चिकटेसह महार बटालीयनचे आजी माजी सैनिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य उत्तम कांबळे यांनी केले. सरणतय गाथेनी सांगता झाली.
