जि. प. प्रा. शा. बेरडवाडी येथे माता – पालक मेळावा उत्साहात संपन्न
मुरुम(१५), प्रतिनिधी: जि. प. प्रा. शा बेरडवाडी, ता. उमरगा जि.धाराशिव येथे माता – पालक मेळावा मोठ्या उत्साहत पार पडला.सदर कार्यक्रमास उपसरपंच श्री दशरथ मंडले शा. व्य. स. अध्यक्ष कांतराव मंडले उपाध्यक्ष रंजित भोकले उपस्थित होते. प्रथमत: कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री वासुदेव व शा. व्य. समिती सदस्या सौ सपना मंडले यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने गावातील आरोग्य विभागाच्या प्रतिनिधी तथा आशा कार्यकर्त्या सौ पूजा सुरेश मांडले याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यानंतर मु. अ.श्री. वाकळे के. ए. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. प्रस्ताविकांनंतर सौ. पूजा मंडले यांनी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयीं माता पालकांनी कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. सौ. भाग्यश्री वासुदेव यांनी सावित्रीमाईचे कार्य आणि महिलांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले.
अशाच सखोल विचार मंथना नंतर सर्व माता-पालकांनी क्रीडास्पर्धाचा आनंद घेतला त्यात संगीत खुर्ची फुगडी खो-खो इत्यादी क्रीडा प्रकारात माता-पालकांनी स्वतःचे कौश्यल्य दाखवले.
शेवटी सौ. राधिका जमादार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती कांबळे तनुजा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राम मंडले, धोंडूबाई मंडले श्री. राठोड गणपत श्री. सोमवंशी कमलाकर श्री. कांबळे मोहन यांनी प्रयत्न केले.
