जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरडवाडी येथे बालिका दिन उत्साहात साजरा
मुरुम(४), प्रतिनिधी:
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस महिला मुक्ती दिन व बालिका दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो.
त्यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरडवाडी येथे शिक्षक शिक्षिका, गावकरी, महिला व बालकाच्या वतीने सावित्रीमाईंना अभिवादन करण्यात आले.
प्रथमत: कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सपनाताई अरुण मंडले, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष कांतराव मंडले उपाध्यक्ष रंजित भोकले शिक्षण प्रेमी जेष्ठ नागरिक चंद्राम मंडले व मु.अ. श्री वाकळे के. ए. यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाईच्या प्रतिमेचे पूजन केले.
बालिका व बालकांनी सावित्रीमाई व क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा करून अभिवादन केले. इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. त्याचबरोबर ओवीच्या माध्यमातून सावित्रीमाईच्या कार्याच्या गौरव गाथा मुलींनी गायल्या. या प्रसंगी शाळा व्य. स. सदस्य सौ. भाग्यश्री तानाजी वासुदेव यांनी विध्यार्थ्यांना भावनिक मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षिका श्रीमती कांबळे टी. ए. यांनी सावित्रीमाईचे कठोर परिश्रम सांगून आजच्या मुलींनी शिकून मोठे यश संपादन करून माईंना खरी आदरांजली अर्पण करावे असे सांगितले. तसेच श्री.कांबळे यांनी फुले दांपत्याचा संघर्ष, सनातन्यानी केलेले अत्याचार याविषयी माहिती सांगीतली. मुख्याध्यापक श्री. वाकळे के. ए. यांनी पालकांना उद्देशून आपल्या पाल्यांच्या शिक्षणा बरोबरच आरोग्याकडेही लक्ष देण्याचे सांगीतले. या प्रसंगी शा. व्य. स. च्या सदस्या सौ. रंगूबाई वासुदेव सौ. भिमाबाई मंडले सौ. सरुबाई मंडले सौ. अश्विनी भोसले सौ. जयश्री शिवपाटील सौ. अंबव्वा वासुदेव श्री. गांधी वासुदेव आणि मोठया संख्येने माता पालक व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.राठोड जी. यु. यांनी केले. वेशभुषेसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सौ. राधिका इरप्पा मंडले यांनी सहकार्य केले. तर उपस्थितांच्या पाहुणचारासाठी स्वयंपाकी धोंडुबाई राम मंडले यांनी कष्ट घेतले. शेवटी श्री. सोमवंशी के. व्ही. यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व अध्यक्षच्या परवानगीने कार्यकमाची सांगता झाल्याचे जाहीर केले .
