भावना नानाजकर यांच्या शैक्षणिक साहित्य निर्मितीस विभागीय पुरस्कार, राज्यस्तरावर निवड…!
उमरगा-१८,(गो. ल. कांबळे याजकडून): शहरातील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या विशेष शिक्षिका भावना नानाजकर यांच्या शैक्षणिक साहित्य निर्मितीस विभाग स्तरावरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने त्यांची राज्यस्तरावर निवड झाली असून शैक्षणिक क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्पर्धेचें आयोजन केले होते. लातूर-नांदेड-धारशिव जिल्ह्याच्या विभागीय स्पर्धेत भावना नानजकर यांची विभागीय स्पर्धेतून शैक्षणिक साहित्य निर्मितीत विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. जानेवारीत ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत त्यांची निवड झाल्याने संस्थेचे अध्यक्ष ॲड. बी. आर. कलवले यांनी अभिनंदन केले आहे.
