भीम झिजला कसा अंत कसा झाला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा भीमराया घे तुला या लेकरांची वंदना
उमरगा- ६,(वा)महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर विविध सामाजिक संघटना राजकिय पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.भारतीय बौद्ध महासभा,त्रिरत्न बौद्ध महासंघ,दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट, समता सैनिक दल,बारअसोसिएशन, आदी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
आ. प्रवीण स्वामीं,माजी नगराध्यक्ष अब्दुल रजाक अत्तार, विजयकुमार नागणे,काँग्रेसचें अर्जुन बिराजदार, विजय वाघमारे, भारतीय जनता पार्टीचे शरण पाटील,हरिष डावरे,एस के चेले,कैलास शिंदे,दिलीप भालेराव,शिवसेनेचे बळीराम सुरवसे,आदींनी अभिवादन केले.
प्रारंभी भन्ते सुमंगल यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन करून त्रिसरण पंचशील दिले.या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष उमेश सुरवसे,सरचिटणीस संगीता सोनकांबळे, सोनी कांबळे, विद्या कांबळे,
धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी विबोध,धममित्र मंदा टिळे,शाक्यदीप कांबळे, एम. एस.सरपे,धीरज बेळंबकर, आदींनी अभिवादन केले.सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर बचत गटाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला दिवसभर विविध गावातून आलेल्या कलपथकाच्या वतीने भीम गीताच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.या वेळी कमलाकर सूर्यवंशी, प्रा महेंद्र कांबळे, कवी गुणरत्न भालेराव, अविनाश भालेराव,अनिल सगर,परमेश्वर टोपगे,आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील विविध गावातून आलेल्या भीमगायन पार्टीच्या कलाकारांनी भीमगीते गाऊन अभिवादन केले.यात
चंद्रमनी कलापथक चिटा, गुणरत्न कलापथक,भीमजोत कलापथक नारंगवाडी,राहुल कलापथक,युनायटेड कलापथक,अशोक कलापथक कलदे निंबाळा,आदी गावच्या भीम शाहिरांनी गीते सादर केली.
