विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उमरगा शहरात भव्य रॅली
उमरगा(६),(वा)भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने शनिवारी रात्री शहरातील हुतात्मा स्मारकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यत पणती रॅली काढून अभिवादन करण्यात आले.
या रॅलीचें उद्घाटन भन्ते सुमंगल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सुधीर कांबळे, धम्मचारी प्रज्ञाजित, उमेश सुरवसे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर हातात पणती घेऊन (पणती) मेणबत्ती रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरून अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे, जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है,बुद्धम शरण गच्छामिचा मंत्र घोष करीत रॅली काढण्यात आली. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष राजश्री कदम, सरचिटणीस विजय बनसोडे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
ही पणती रॅली नगर पालिके समोर येताच डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्यास विद्याताई कांबळे, सोनाली कांबळे, उमेश सुरवसे, संगीता कांबळे, उमाजी गायकवाड, ब्रम्हांनंद गायकवाड, तात्याराव मादळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर पाली पूजा घेण्यात आली. जिल्हा अध्यक्ष राजश्री कदम व विजय बनसोंडे यांनी मार्गदर्शन केले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या पणती रॅलीत सारनाथ बौद्ध विहार व भीमनगरच्या भीम अनुयायांनी सहभाग घेतला होता डिग्गी रोड समता नगर, इंदिरा मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थिनीस दिगंबर सरपे यांनी मुलींच्या वसतिगृहापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पर्यत पणती ज्योती घेऊन रॅली काढली होती.
शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी या पणती रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी, समता सैनिक दलाचे जवान, बोधिसत्व बचत गटाचें पदाधिकारी, सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर बचत गटाचें सदस्य महिला मंडळ यांनी सहकार्य केले. नवनाथ गायकवाड, विशाल सोमवंशी, मिलिंद कांबळे, धीरज कांबळे, कुशिंद्र सोनकांबळे, शाक्यदीप कांबळे, शिवाजी गायकवाड, बालाजी गायकवाड, प्रा. नागनाथ गायकवाड,प्रा. संतोष सुरवसे, प्रा. अप्पाराव गायकवाड, बालाजी कांबळे, सुभाष काळे, किरण कांबळे आदींनी पुढाकार घेतला होता. उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी रॅलीस चोख बंदोबस्त ठेवून रॅली शांततेत पार पडण्यासाठी मदत केली.
