महिला सक्षमीकरणाकडे आणखी एक पाऊल;
विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे महापूर येथे
५६ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान
लातूर(८),प्रतिनिधी:
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने महापूर येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ५६ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि ट्वेंटीवन ॲग्री लि. च्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या पुढाकारतून हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात आले होते. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे आणि स्वयंरोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे. महापूर येथील या प्रशिक्षण केंद्रात महिलांना ३ महिन्यांचे व्यावसायिक
शिलाई प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये शिलाईच्या विविध पद्धती, डिझाइनिंग आणि कटिंग यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले. प्रशिक्षक क्रांती उफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ५६ महिलांनी शिलाई कामातील कला
आणि कौशल्ये आत्मसात केली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, गावच्या सरपंच कल्पना माने, ग्राम सदस्य उत्तमराव वरवटे, संदीप माने, ग्रामसेवक अनंत सूर्यवंशी, ग्राम सदस्य श्यामकरण अंकुशे, अमोल कलबंडे, प्रशिक्षक क्रांती उफाडे, गजानन बोयणे यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
