थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीममेस सुरुवात
नागरिकांनी तातडीने कर भरून प्रशासनास सहकार्य करावे – आयुक्त श्रीमती मानसी
आज १६ निवासी मालमत्ता ची अटकावणी व ८ नळखंडनची कार्यवाही
लातूर(३),प्रतिनिधी : मालमत्ता कर वसुली साठी महानगरपालिकेने अनेक वेळा कर सवलतीची योजना राबवली मात्र बर्याच मालमत्ताधारकांनी याकडे कानाडोळाच केला.त्यामुळे महानगरपालिकेने आता थेट धडक जप्ती मोहिमेला सुरवात केली आहे.त्याकरिता ८ पथक नेमण्यात आले आहेत.
लातूर शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रलंबित मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मालमत्ता कराची थकबाकी ठेवणाऱ्या करदात्यांविरुद्ध कठोर पावले उचलून त्यांच्या मालमत्तांवर जप्ती व नळ खंडन कारवाई करण्यात येत आहे.
आज दि.३ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय सी अंतर्गत तीन नळखंडन करण्यात आले व तर ३ निवासी मालमत्तांचे जप्ती करण्यात आले तसेच क्षेत्रीय करायला ब तीन नळखंडन व ५ निवासी मालमत्तांचे जप्ती करण्यात आले आले. तसेच क्षेत्रीय कार्यालय अ अंतर्गत जप्ती मोहिमेअंतर्गत ८ निवासी मालमत्तांचे जप्ती करण्यात आले. थकीत कराच्या वसुलीसाठी मनपाकडून मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. जप्त केलेल्या मालमत्ताधारकांनी मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे . त्यामुळे जप्तीसारखी कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरून मनपाला सहकार्य करावे,असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे.
