जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघामध्ये ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचा प्रवेश सुरु
लातूर,दि.२ः महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संचलित ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाची प्रवेश प्रक्रिया हुतात्मा स्मारक, लातूर येथे दि.१ डिसेंबर २०२५ पासून सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ या वेळात सुरु झाली असून,ती २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर प्रवेश अर्ज भरावा असे आवाहन जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कापसे आणि कार्यवाहक राम मेकले यांनी केले आहे.
शाळा,महाविद्यालये,आश्रमशाळा,न्यायालय,आरोग्य विभाग ग्रंथालय यासह विविध क्षेत्रात ग्रंथपालन प्रमाणपत्र उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे.ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग प्रवेशासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,प्रवेशासाठी बारावीचे गुणपत्रक,सनद,टी.सी.अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र,आधारकार्ड, तीन पासपोर्ट फोटो अर्जासोबत द्यावा,दि.१ जानेवारी ते ३० जून हा वर्गाचा कालावधी असून,दर शनिवार आणि रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात वर्ग असतील, हे वर्ग नियमित होणार असून, उपस्थिती आवश्यक आहे.शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय,शाळा,महाविद्यालयातील नियुक्ती असणार्यास प्रथम प्राधान्य राहील.तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी मो.नं.७७०९९७०७७५,८८५५००८०५७ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
