इस्रोचे अध्यक्ष डॉ. नारायणन यांच्या हस्ते लातूरचे विकास उगले यांना पीएचडी प्रदान
लातूर : लातूर येथील रहिवाशी विकास वसंतराव उगले यांनी यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग ) या विषयात पीएच. डी. मिळवली आहे. ही पदवी त्यांना व्हीलटेक रंगराजन डॉ. सगुंथला आर आणि पी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी चेन्नई येथील पदवीदान समारंभात इस्रोचे अध्यक्ष डॉ. नारायणन यांच्या हस्ते विकास वसंतराव उगले यांना प्रदान करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे कुलगुरू तसेच विविध अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.विकास उगले यांनी आपल्या संशोधनात मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
विकास उगले यांनी संशोधन क्षेत्रात विशेष कामगिरी बजावली असून त्यांनी विविध तंत्रज्ञाशी संबधित प्रकल्पावर कार्य केलेले आहे. त्यांनी यांत्रिकी, अभियांत्रिकी, मशीन लर्निंग या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. विकास उगले हे सध्या पुणे येथील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये
सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध शोध विषयावर संशोधन करून देश आणि जागतिक स्तरावर संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. विकास उगले यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आपली संशोधन पत्रे सादर केली असून त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे. विकास उगले यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लातूर येथेच झाले आहे. त्यानंतरचे यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथील वाडिया कॉलेज येथे झाले. त्यानंतर थर्मल अभियांत्रिकीत एमटेक पर्यँतचे शिक्षण मुंबई येथे
झाले. आता त्यांनी वेलतेक डॉ. रंगराजन सगुंथला संशोधन विकास विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था चेन्नई येथून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. विकास उगले हे एका स्वातंत्र्य सैनिकांचे नातू असून त्यांचे वडील आणि भाऊ विधिज्ञ आहेत. त्यांच्या या यशाबद्दल लातूरचे माजी खासदार, माजी नगराध्यक्ष व माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, ॲड.सुधाकर आवाड, ॲड.भगवानराव साळुंके, नाशिकचे न्या. अमर काळे, सिजीएम न्या. इगतपुरी, अंजली
काळे, मुंबई हायकोर्टाचे ॲड. वैभव उगले, मुंबई येथील डीवायएसपी राजेंद्र उगले, डॉ. स्वप्नील व्यवहारे, डॉ. सूर्या व्यवहारे, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप, ॲड.श्रीमंत भोसले, ॲड.शिवाजीराव कानवटे, ॲड.डी. पी. शिरूरे, ॲड.चिखलीकर, ॲड.एस. पी. लामतुरे, ॲड. पी. आर. केदार, ॲड.कुळकर्णी, ॲड.चौधरी, ॲड.बनसोडे, डॉ.धनंजय गिरी आदी मान्यवरांनी विकास उगले यांचे अभिनंदन केले आहे.
