यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंत वेणू पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आ. कव्हेकर व सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांचा सत्कार
लातूर(२),प्रतिनिधी –
देशात व राज्यामध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणेचा यशवंत वेणू राज्यस्तरीय पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, पद्मश्री गिरीष प्रभूणे यांच्याहस्ते पुणे येथील अॅटो क्लस्टर सभागृहात माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्याबद्दल लातूर येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.गोविंदराव घार, नाशिक विद्यापीठाचे प्र.कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, हरंगुळ (बु) येथील बाबुराव पाटील, कमलाकर कदम, प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी, शिवाजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सतीश यादव, नगरसेविका रागिणीताई यादव, माजी नगरसेविका केशरबाई महापुरे, प्रा.शंकर यादव, सरदार शेख, प्रा.डॉ.श्रध्दा अवस्थी, डॉ.एम.आर.पाटील, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, मुख्याध्यापिका अरूणाताई कांदे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.शोभा माने, डॉ.अनिता खडके, डॉ.स्मिता मामिलवार, प्रा.डॉ.संगिता गोविंदराव घार, अॅड.आगरकर आदींनी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
