माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी साधला नागरिकांशी संवाद
नागरिकांच्या अडीअडचणी ऐकून घेत निवेदनांचा केला स्वीकार.
लातूर(२), प्रतिनिधी-
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि.०२ डिसेंबर रोजी
सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,नागरिक यांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.अडीअडचणी समस्या समजून घेऊन त्यांच्या
निमंत्रनाचा तसेच निवेदनाचा स्वीकार करीत पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधिताना सूचना केल्या.
यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हा.चेअरमन समद पटेल,ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख,लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेद्रे,डॉ.अशोक आरदवाड,डॉ. मुकुंद भिसे,सुधीर गोजमगुंडे, सुदर्शन बिराजदार, संजय निलेगावकर,अमर राजपूत,व्यंकटेश पुरी, आर.बी.पाटील,अक्षय शहरकर,पिराजी साठे,बंकट पवार, अभिषेक पतंगे, मोहन सुरवसे, विवेक गवळी, शिवकांत सारगे,बादल शेख,डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ.व्यंकट येलाले, डॉ. अभय ढगे, सचिन सुरवसे, आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.
दिनदर्शिका प्रकाशन
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरातील उद्योग भवन ट्युशन एरिया मधील ज्ञानेश्वर गर्ल्स हॉस्टेलचे संचालक सुदाम शिंदे यांनी काढलेल्या दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करण्यात आले.
