३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक राऊत सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात
लातूर: कमला नेहरू माध्यमिक विद्यालय, लातूरचे मुख्याध्यापक श्री. राऊत सर यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३३ वर्षे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिल्याबद्दल राऊत सरांचा त्यांच्या सुविद्य पत्नीसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सय्यद यास्मिन मॅडम या होत्या. संस्थेचे सचिव अजिज सय्यद सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन राऊत सरांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राऊत सर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय कार्याचा विशेष उल्लेख केला. विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता, शिक्षकांमधील समन्वयाची भूमिका आणि संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले योगदान याबद्दल अनेकांनी भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व सुखसमृद्धीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे सदस्य तथा मुख्याध्यापक (सय्यद अंकुलगा) अश्फाक सय्यद सर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सय्यद सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नुसरत देशमुख मॅडम, पर्यवेक्षक सिद्दिकी अन्वर सर, मुजफर सर, कुलकर्णी सर, राजमाने सर, लिंबोरे सर, वाघमारे सर, पठाण सर, शेखनूर सर, कचबावार सर, जाहेद सर, पठाण वाय. ए. सर, जावेद सर, चादर सर, घोडके सर, गायकवाड सर, कापुरे सर, राहुल गायकवाड सर, शेख खालेद सर, इंजिनियर गायकवाड सर, लामतुरे सर, प्रकाश जोशी सर, रवी महापुरे, ओमकार भिसे, मुळे मॅडम, शेख मॅडम, पठाण मॅडम, रपकाळ मॅडम, लक्ष्मीबाई सूर्यवंशी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राऊत सरांच्या आई, भाऊ संजय राऊतसह मित्रमंडळी तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल कुलकर्णी सर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती अनुराधा कुलकर्णी मॅडम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सिद्दिकी अन्वर सर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
