लातूर :
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे २५ ऑक्टोबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
राज्यपाल श्री. बागडे यांचे धाराशिव जिल्ह्यातील शिंगोळी येथून लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील मोरया लॉन्स येथे २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:१५ वाजता आगमन होईल. याठिकाणी सकाळी १०:३० वाजता श्री प्रभाकरराव कुलकर्णी गुरुजी गौरव समितीमार्फत आयोजित समारंभाला ते उपस्थित राहतील. दुपारी १:१५ वाजता ते छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
