चांदीचे पुरस्कार विकुन शेतकऱ्यांना मदत करणार- समाजसेवक विनायकराव पाटील
उमरगा-30 (प्रतिनिधी)-
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अविरत झटत असलेल्या अवलीयाने समाज सेवेच्या २५ वर्षाच्या कालावधीत मिळालेले चांदीचे पुरस्कार विकून पाच शेतकऱ्यांना मदत करण्याचा संकल्प शेतकरी नेते विनायकराव पाटील कवठेकर यांनी केला आहे. सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी करणे शक्य नसल्यास शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन मूल्यावर आधारीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार भाव द्याव अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. शहरातील आदर्श महाविद्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ राम सोलंकर, प्राचार्य श्रीराम पेठकर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. वाढती महागाई, नापीकी, शेतमालाना मिळणारा कवडीमोल भाव या विवंचने मुळे शेतकरी स्वहत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादीत खर्चाच्या अधारीत भावांतर योजना लागू करून कर्जमाफी वरील खर्च टाळून कृषि मालाला उत्पादीत खर्चावर आधारित भाव देण्यात यावेत अशी मागणी पाटील यांनी सरकार कडे केली आहे. विविध शेतकरी संघटना, विविध पक्षा कडून सरकार कडे सातत्याने शेतकरी कर्ज माफीची मागणी केली जात आहे. शेतकरी कर्ज माफी हा शेतकऱ्यांच्या हिताचा कायम स्वरूपी तोडगा होऊ शकत नाही. शेतऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शेतमालाला भावांतर योजना लागू करून शेतमालाच्या उत्पादीत खर्चावर अधारीत भाव देणे गरजेचे आहे.मागील पंचेवीस वर्षाच्या कालावधी दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्या उभ्या करणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना स्वतःची शेतजमीन व घर विकून आर्थिक मदत केली आहे. आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलां-मुलीना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला आहे. निराधार शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम सुरु आहे.आगामी काळात राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लढा सुरूच राहणार आहे. अतिवृष्टी मुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यंदा दिवाळी साजरी करता आली नाही. बहुतांश गरीब शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली नाही. त्यामुळे पंचेवीस वर्षाच्या कालावधीत मला मिळालेले चांदीचे पुरस्कार विकून पाच शेतकऱ्यांना अर्थ साह्य करण्याचा निर्धार केल्याचे पाटील यांनी सांगितले.
