भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्षपदी उमेश सुरवसे तर सरचिटणीसपदी संगीता सोनकांबळे यांची निवड
गो.ल.कांबळे यांजकडून-
उमरगा( दि.३०)
येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी भारतीय बौध्द महासभा तालुका कार्यकारिणीची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृहात रविवारी घेण्यात आली. या वेळी तालुकाध्यक्ष पदी उमेश सुरवसे तर सरचिटणीसपदी संगीता सोनकांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी उमरगा तालूका कार्यकारणी निवड करण्यात आली.
तालुकाध्यक्ष पदी उमेश सुरवसे यांची तर सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे,कोषाध्यक्ष सोनाली कांबळे, उपाध्यक्ष तातेराव मादळे, सचिव नवनाथ गायकवाड,आदित्य कांबळे, महिला उपाध्यक्ष लताबाई कोल्हे, उषाबाई गायकवाड,संगीता गायकवाड, बालाजी सुर्यवंशी, लिंबाजी गायकवाड, विशाल सोमवंशी,किरण कांबळे, राजेंद्र सुरवसे, हणमंत कांबळे, लक्ष्मीबाई गायकवाड, सिद्राम भोसले आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम यांनी केला व नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विजय बनसोडे यांनी केले तर संगीता सोनकांबळे यांनी आभार मानले.
