गाव तेथे बौद्धाचार्य व घर तेथे समता सैनिक निर्माण करा – स्वातीताई गायकवाड
लातूर(१०), प्रतिनिधी-
भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यालय, मुंबई यांच्या वतीने दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी संपूर्ण भारताभर अखिल भारतीय बौद्धाचार्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. लातूर परीक्षा केंद्रावर गुणवत्तेनुसार 15 विद्यार्थ्यांची परीक्षार्थीसाठी निवड करण्यात आली होती. या परीक्षेनंतर परीक्षार्थीना मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका,मुंबई आयुनि. स्वातीताई गायकवाड म्हणाल्या की, धम्म चळवळ शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जायचे असेल तर आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर व आदरणीय डॉ. भीमराव आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून “गाव तेथे बौद्धाचार्य व घर तेथे समता सैनिक” जिल्हा शाखेने निर्माण करणे आवश्यक आहे. डॉ.भीमराव साहेबांच्या संकल्पनेतून बौद्धाचार्यांनी धम्माचे काम केले तर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारी धम्म चळवळ किंवा भारत बौद्धमय होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्षा आशाताई चिकटे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष गौतम बनसोडे, सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे व आभार जिल्हा सचिव प्रेमनाथ कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाला राज्य संघटक प्रा. बापू गायकवाड, असि. जनरल लेफ्ट. राजाराम साबळे, केंद्रीय शिक्षक श्रीमंत कांबळे, केंद्रीय शिक्षिका कविताताई कांबळे, केंद्रीय शिक्षिका मायाताई कांबळे, केंद्रीय शिक्षिका सुरेखाताई भालेराव, डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे, मुख्याध्यापक एस. एम. गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष अर्जुन कांबळे, जिल्हा सचिव प्रेमनाथ कांबळे, जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे, जिल्हा सचिव दत्तात्रय भोसले, जिल्हा हिशोब तपासणी राजाभाऊ उबाळे, देवराव जोगदंडे, तालुकाध्यक्ष अशोक कांबळे, तालुका संघटक प्रकाश अडसुळे, इ. उपस्थित होते.
