ही लढाई तिकिटाची नाही महापुरुषांचे विचार जिवंत ठेवण्याची आहे : काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचे सत्कार समारंभात प्रतिपादन
काँग्रेसचे निष्ठावंत प्रा. डॉ. शिवाजीराव जवळगेकर यांनी प्रभाग 13 मध्ये सभा घेऊन मागितली उमेदवारी
लातूर(10) : प्रा. डॉ.शिवाजीराव जवळगेकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पुरोगामी विचाराचे आहेत. वाजवून सभा घेऊन उमेदवारी कशी मागायची हे त्यांनी लातूरला दाखवून दिले आहे. लातूर मनपा निवडणुकीत तिकीट कुणालाही मिळो, ही लढाई तिकिटाची नसून महापुरुषांचे विचार जिवंत ठेवण्याची आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी येथे मांडले. लातूर शहरातील प्रभाग 13 मधील प्रकाशनगर येथील श्री दत्त मंदिराच्या सभागृहात प्रा. शिवाजीराव जवळगेकर व मित्र परिवाराच्या वतीने 9 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष ऍड. किरण जाधव, मनपा प्रभाग संपर्क प्रमुख सूर्यकांत कातळे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश नवगिरे यांच्या सत्कार सोहळ्यात अभय साळुंके बोलत होते. यावेळी माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेविका श्रीमती कमलताई सोमवंशी,स्वाती जवळगेकर, ऍड. विजय गायकवाड, किरण जाधव, माजी नगरसेवक धोंडीराम यादव, युवक काँग्रेचे नेते सतीश साळुंके, मुन्ना शिंदे,स नालंदा ट्रस्टचे उत्तमराव कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अभय साळूंके यांनी आपल्या भाषणात मनुवादी धर्म मार्तंडानी सव्वा लाख लिंगायत समाजाच्या लोकांची बसवेश्वरांच्या काळात हत्या केली..आणि लिंगायत समाजातील बहुसंख्य लोकं त्याचं विचाराच्या भाजपात आहेत. काँग्रेस हा सर्व सामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसलाच मतदान करणे गरजेचे आहे. काँग्रेचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड. किरण जाधव म्हणाले, प्रा. शिवाजीराव
जवळगेकर सरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे..त्यांनी वाजवून उमेदवारी मागत आहेत. त्यांचे काँग्रेस साठी मोठे योगदान आहे. प्रभाग 13 मध्ये काँग्रेसने जेवढी कामे केली तेवढी कोणीही केलेली नाहीत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. नवगिरे यांनी साद्या सोप्या भाषेत काँग्रेस काय आहे, ते सांगितले. प्रारंभी प्रास्ताविकपर भाषणात प्रा. डॉ. शिवाजीराव जवळगेकर यांनी मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणुकीत योग्य, निष्ठावंत, इमानदार कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नाही.. भांडण करणाऱ्या आक्रमक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते. याबद्दल नाराजी व्यक्त केली. शिवाय प्रभाग 13 मध्ये नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या साठी रुग्णालयाची आवशक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 40 वर्षांपासून इमानदारीने काँग्रेस पक्षात काम केले. इमानदार कार्यकर्त्याला संधी, न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सत्कार कार्यक्रमाला प्रभाग 13 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कांबळे यांनी केले तर अशोक देडे यांनी आभार मानले.
