दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृतीसाठी मंगळवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा
लातूर, दि. १० : जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृतीसाठी मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही कार्यशाळा होईल.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे राहणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधिक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्रीराम देशपांडे, केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसनचे कार्यवाहक डॉ. योगेश निटुरकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेत दिव्यांगांच्या विविध कायदेविषयक बाबीवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेला जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.
