राजकीय व जेएसपीएम संस्थेच्या वाटचालीमध्ये कै.निळकंठराव पवार यांचे योगदान मोलाचे आहे. – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.11
1986 मध्ये सभापती असताना ते बाजार समितीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 1993 नंतर जेएसपीएम संस्थेमध्ये सेवेत राहण्याची संधी उपलब्ध करून देताच त्यांनी आहे. त्या पदाचा राजीनामा देऊन संस्थेच्या वाटचालीमध्ये योगदान देण्याचे काम केले. त्यांच्या अंगी कुशल संघटकपणा असल्यामुळे त्यांनी लातूर जिल्ह्यातील दीडशे गावामध्ये मोठे संघटन निर्माण करून राजकीय वाटचालीमध्ये व जेएसपीएम संस्थेच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. असे राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक व्यक्तिमत्त्व येतात व जातात परंतु त्यांनी दिलेली साथ व संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान न विसरणारे आहे. त्यामुळे माझ्या राजकीय व संस्थेच्या वाटचालीमध्ये कै.निळकंठराव पवार यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित जेएसपीएम शिक्षण संस्थेचे समन्वयक संचालक कै.निळकंठराव पवार यांच्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला जेएसपीएम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजपा शहर जिल्ह्याच्या महामंत्री रागिणीताई यादव, प्रा.सतीश यादव, जेएसपीएम संस्थेचे समन्वयक विनोद जाधव, समन्वयक अनिरूध्द पाटील, शरणअप्पा आंबुलगे, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य लक्ष्मीकांत गौड, प्राचार्य पद्युम्न इगे, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी, समन्वयक डॉ.शैलेश कचरे, प्राचार्य विकास लबडे, प्राचार्य शिवहार बोंडगे, मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण, उपप्राचार्य दयानंद हासबे, उपप्राचार्य नवाब एजाज, आंतेश्वर कपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, जेएसपीएम संस्था, कव्हेकर व पवार परिवाराच्या वाटचालीमध्ये भाच्चे निळकंठ यांचे योगदान मोठे आहे. त्यांना पंधरा दिवस हैदराबाद येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणाही झाली होती. परंतु त्यानंतर लातूरकडे येत असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि लातूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन दिवसानंतर त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने जेएसपीएम संस्था, कव्हेकर व पवार परिवारांचे मोठे नुकसान झालेले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशी भावणाही त्यांनी यावेळी बोलाताना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै.निळकंठराव पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्वांच्या उपस्थितीत दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी या शोकसभेला जेएसपीएम परिवारातील सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेएसपीएम परिवारातील जबाबदार व्यक्ती म्हणून खंबीर साथ देण्याचे काम कै.निळकंठराव पवार यांनी केले – अजित पाटील कव्हेकर
जेएसपीएम शिक्षण संस्थेचे समन्वयक कै.निळकंठराव पवार दाजी यांना मी लहानपणापासून अनुभवलेले आहे. 2012 ते आजपर्यंत कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी साहेबांच्या आणि संस्थेच्या वाटचालीमध्ये योगदान देण्याचे काम केलेले आहे. साहेबांवर त्यांची प्रचंड श्रध्दा आणि निष्ठा होती. साहेबांनी सोपविलेले कुठलेही काम तात्काळ तडीस नेण्याचे काम त्यांनी केलेले आहे. आता त्या तोडीने काम करणारा माणूस तयार होण्यासाठी किती काळ घालावा लागेल. त्यांच्या अकाली निधनामुळे संस्थेचे कधी न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. त्यांनी त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून कुटुंबाला आणि जेएसपीएम परिवाराला साथ देण्याचे काम निळकंठ पवार दाजी यांनी केलेले आहे, त्यामुळे त्यांची उणीव कायम भासणार आहे. असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले.
