प्रधानमंत्री शिष्यवृती योजना प्रस्ताव ऑनलाईन पाठविण्याचे आवाहन
लातूर, दि. 11 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळण्यासाठी याबाबतचे प्रस्ताव www.ksb.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सादर करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. इयत्ता 12 वी किंवा पदविका अभ्यासक्रमात 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या माजी सैनिक /विधवा यांच्या मुलीस 36 हजार रुपये व मुलास 30 हजार रुपये एवढी वार्षिक शिष्यवृती देण्यात येते.
शिष्यवृतीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 अशी आहे. तरी लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवांच्या पात्र पाल्यांचे पंतप्रधान शिष्यवृती योजनेचे अर्ज विहीत मुदतीत भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत) यांनी केले आहे.
