यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व
सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांना राज्यस्तरीय यशवंत-वेणू सन्मान गौरव पुरस्कार जाहीर
लातूर दि.15
पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी कृषी, शैक्षणिक, सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार दिले जातात. यामध्ये आतापर्यंत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, दिलीप वळसे पाटील, डॉ.पी.डी.पाटील, यशवंतराव गडाख, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पोपटराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, ना.धो.महानोर, विठ्ठल वाघ, रावसाहेब शिंदे, बाळासाहेब विखे पाटील, चंद्रकांत दळवी, श्रीनिवास पाटील, उल्हासदादा पवार अशा महान व्यक्तिंना देण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर यंदाही या ऐतिहासिक पुरस्काराची घोषणा यंशवतराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केली असून यावर्षीचा यशवंत-वेणू राज्यस्तरीय सन्मान गौरव पुरस्कार भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी आजपर्यंत आर्य समाजाच्या माध्यमातून स्वामी डॉ.देवव्रत्त आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन, प्राणायाम चळवळ संपूर्ण लातूर जिल्ह्यात वाढविली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कामगारांसाठी माथाडी बोर्ड लागू करून त्यांचे जीवन बदलून टाकले. शेतकर्यांना समान न्याय दिला. जेएसपीएम संस्थेच्यावतीने व महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करून शेतकर्यांना मुलांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. राजकारणाच्या माध्यमातून व्हिजन, आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व चारित्र्याची, विचाराची जपणूक केली. अनेक वर्षे विविध क्षेत्रात काम करूनही चारित्र्य जपण्याचे केले. जागतिक व देशातील विविध विषयाचे अभ्यासक म्हणून त्यांची एका वेगळ्या फळीमध्ये गणना होते. लोकयोगी या आत्मचरित्राचे लिखाण करून कव्हेकर साहेबांनी आपल्या कणखर कार्यातून समाजाला, विभागाला सर्वांना न्याय देण्याचे काम केले. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने राज्यातील नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर, माजी खा.डॉ.जनार्दन वाघमारे, प्राचार्य डॉ.जगदीश कदम यांनी कव्हेकर साहेबांच्या वैचारिक, अभ्यासक, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्वाबद्दल जे विचार मांडले, ते अविस्मरणीय आहे. या सर्वांची पाहणी करून देशातील प्रसिध्द अवार्ड माजी आ.कव्हेकर यांना देण्यात येत आहे.
तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनीही जिल्हा परिषदेच्या कार्यकाळामध्ये उत्कृष्टपणे काम करून लातूर जिल्हा परिषदेचा देशात पहिला क्रमांक मिळवून 50 लाखांचे व राज्याचे 35 लाखांचे पारितोषिक मिळवून देण्याचे काम केलेले आहे. ऑल इंडिया लिनेस क्लबच्या माध्यमातून व महिला बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे या कार्याची दखल घेऊन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांना यशवंत-वेणू सन्मान गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
