December 8, 2025
esakal_import_s3fs-public_news-story_cover-images_1_E0_A4_B2_E0_A4_BE_E1602313083

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५

प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍दी बाबत.

लातूर(१९),प्रतिनिधी : याद्वारे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता  राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र राज्‍य यांनी आदेश क्रमांक राज्‍य निवडणूक आयोग यांचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.४१/का-५ दिनांक  १३/११/२०२५ अन्‍वये मतदार यादी तयार करण्‍यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता. सदर कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्‍याचा कालावधी दिनांक २०/११/२०२५ ते २७/११/२०२५ असा आहे. राज्‍य निवडणूक आयोग यांचे आदेशान्‍वये  मतदार यादी तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहीर केला असून तो खालीलप्रमाणे आहे.

  •           निवडणूकीचा टप्‍पा सुरु करण्‍याची / पूर्ण करण्‍याची तारीख

१. राज्‍य निवडणूक आयोगाचे अधिसुचीत केलेल्‍या तारखेस अस्तित्‍वात असलेल्‍या विधानसभेच्‍या मतदार यादीवरुन महानगरपालिकांच्‍या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारुप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्‍याकरिता प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक  दि. २०/११/२०२५

२. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्‍याचा अंतिम दिनांक दि. २७/११/२०२५

३. प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्‍द करणे. दि. ०५/१२/२०२५

४. मतदान केंद्राच्‍या ठिकाणांची यादी प्रसिध्‍द करणे. दि. ०८/१२/२०२५

५ मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्‍द करणे   दि. १२/१२/२०२५

दि. २०/११/२०२५ ते २७/११/२०२५ पर्यंत  स्विकारण्‍यात येणार आहेत.. सदर हरकती सुचना लेखी स्‍वरुपात महानगरपालिका निवडणूक शाखा व झोन कार्यालय येथे हरकती व सूचना स्विकारल्‍या जाणार आहेत.

तसेच महानगरपालिका निवडणूक विभाग येथे प्रभाग १ ते १८ ची प्रारुप मतदार यादी पहाणेसाठी उपलब्‍ध आहे, झोन ए प्रभाग क्रमांक १०,११,१२,१३,१४, झोन बी १५,१६,१७,१८  झोन सी ३,४,५,६ झोन डी,१,२,७,८,९  येथे या प्रभागाच्‍या यादया ठेवण्‍यात आल्‍या आहे व मनपाच्‍या संकेतस्‍थळावर प्रारुप मतदार यादी मतदारांसाठी सुचना व हरकतीचे नमूने – mclatur.org या वर ही उपलब्‍ध आहे. याबाबत सर्व झोन वर नमुना अ व ब मध्‍येच हरकती स्विकरण्‍यात येणार आहे . या बाबत नागरीकांनी नोंद घ्‍यावी.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!