लातूर जिल्हा गुणवत्ता कक्ष समिती सदस्यपदी प्राचार्य गोविंद शिंदे यांची निवड
लातूर दि. (21)
लातूर येथील प्राचार्य गोविंद शिंदे यांची जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या समिती सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता सुधारण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल विचावंत गु्रपच्यावतीने प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी, कमलाकर कदम, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, बापूसाहेब गोरे, प्रा.जीवन जाधव यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या समितीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा गुणवत्ता कक्ष समितीचे कार्य असणार आहे. शाळा व्यवस्थापन आणि कार्यक्रम सल्लागार यांसारख्या समित्यांची रचना आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी मदत होणार आहे.
या समित्यांमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारणे, गुणवत्ता वाढवणे आणि धोरणात्मक बदल घडवून आणणे यांसारख्या कामांवर लक्ष केंद्रित केले जाते. त्याचबरोबर शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि धोरणात्मक बदल घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे आदींबाबत धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. प्राचार्य गोविंद शिंदे यांचे लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान पाहता त्यांचा आजपर्यंतचा अनुभव यासाठी निश्चितच मोलाचा ठरणार आहे.
