लातूर महानगरपालिकेमार्फत मतदार यादी पाहाण्यासाठी हेल्प डेस्क सुरु
लातूर(२७),प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दिनांक १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजन करुन प्रारुप मतदार यादी तयार करुन ती दिनांक २०/११/२०२५ रोजी प्रसिध्द करुन दिनांक ३/१२/२०२५ पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत.
त्यासबंधीत नागरीकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, आपले नाव पाहाण्यासाठी आपल्या प्रभागाच्या क्षेत्रीय कार्यालय A, B, C, व D येथे व राज्य निवडणूक आयोग यांचे संकेतस्थळ https://mahasecvoterlist.in मध्ये Search Voterlist हे आपल्या मोबाईल किंवा संगणकावर सर्च करुन आपले नाव पाहता येईल. आपल्या मदतीसाठी (हेल्प डेस्क) झोन निहाय कर्मचारी नेमणूक करण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे निवडणूक विभागात संगणकावर पाहण्यासाठी सोय करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी आपले नाव आपण राहत असलेल्या प्रभागाच्या मतदार यादीत आले असल्याची खात्री करुन घ्यावी व काही आक्षेप असल्यास विहीत मुदतीत दाखल करावे.
