17/03/2026
Novices_meditating

लोहा येथे दहा दिवशीय श्रामणेर बौध्दाचार्य शिबिराचे आयोजन..!

लोहा(२८), प्रतिनिधी :  भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लोहा वतीने सर्व बौद्ध बांधवांना कळविण्यात की, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लोहा जिल्हा नांदेड या संस्थेमार्फत तालुका लोहा येथे श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर दि. 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2026 पर्यंत, 10 दिवसाच्या कालावधीत, लोहा शहरातील क्रांतीसुर्य बौद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले आहे.

तरीही सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांनी ज्यांना श्रामणेर बौद्धाचार्य शिबिरात भाग घ्यायचा आहे. त्यांनी तालुका शाखा लोहा या संस्थेकडे नाव नोंदणी करावी. शिबिरातची फीस भरून पावती घ्यावी.

श्रामणेर बौद्धाचार्य शिबिरात भाग घेणाऱ्या शिबिरार्थीसाठी एकूण फीस 500 अशी आकारण्यात आली आहे. त्यासाठी आपली नोंद तालुका शाखेकडे करावी. असे आवाहन तालुका अध्यक्ष बापूसाहेब कापुरे यांनी केले आहे.

श्रामणेर संघास भोजनदान देणाऱ्या ग्रामस्थांनी उपासक-उपासिकांनी आपापल्या गावाची नावे तालुका शाखेकडे नोंदवावी तसेच वैयक्तिकरित्या सकाळचा नाष्टा फराळ व रात्रीचा फलहार कोणत्याही एक वेळचा चहा देणाऱ्या उपासक- उपासिकांनी आपली नावे तालुका शाखेकडे नोंदवावीत. शिबिर यशस्वीरित्यापणे पार पाडण्यासाठी सर्व बांधवांनी जास्तीत जास्त धम्मदान द्यावे व या दहा दिवसाच्या काळामध्ये होणाऱ्या धम्म प्रवचनास उपस्थित रहावे आणि पुण्य कर्म करावे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून श्रामणेर शिबिर संपन्न होणार आहे.

नाव नोंदणीसाठी खालील पदाधिकाऱ्याची संपर्क साधावा. आयु. बापूसाहेब माधवराव कापुरे (तालुका अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक) 8149700358, आयु. धोंडिबा बळीराम यानभुरे (तालुका सरचिटणीस तथा केंद्रीय शिक्षक) 9096139254

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!