डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकरांचा सर्वोच्च न्यायव्यवस्थेला खडा सवाल!
छत्रपती संभाजीनगर
देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय म्हणून रामजन्मभूमी हिंदूंना देण्यात आली, मग त्याच ‘श्रद्धेच्या निकषांवर’ बोधगयेतील महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का होत नाही? असा थेट आणि खडा सवाल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी रविवारी केला. ते भिक्खू करूणानंद थेरो यांच्या महाथेरो समारंभ व कठीण चिवरदान धम्मसोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मिलिंद महाविद्यालय मैदानावर बोलत होते. या वेळी देशभरातून हजारो उपासक-उपासिका उपस्थित होते.