
यावर्षी महाराष्ट्र राज्यातील ३९ पुरस्कार्थीना पुरस्कार प्रदान
लातूर प्रतिनिधी-
महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन या सामाजिक संघटनेच्या वतीने अत्यंत सन्मानाचा पुरस्कार भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील अण्णाराव पाटील होते. मंचावर लातूरचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे होते तसेच लातूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी, सलोखा राखून आपल्या क्षेत्रात राहून गोरगरीब, दीन-दुबळ्या, जनतेची निस्वार्थपणे सेवा केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेच्या विधी सल्लागार ज्ञानेश्वरीताई बटवाड, पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, समता सैनिक दलाचे देवराव जोगदंडे, लातूर तालुका सचिव पवन कांबळे, सेलूकर तसेच तालुका उपाध्यक्ष बिभीषण ढगे यांना समाजसेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
डॉक्टर,अभियंता,वकील,समाजसेवक, इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यानां दरवर्षी या संघटनेकडून गौरविण्यात येते.
संघटनेचे अध्यक्ष श्रीराम घुले आणि सचिव सुफी सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.