
विक्रम नगर येथील श्रावस्ती बुद्ध विहार या ठिकाणी वर्षावास समापन कार्यक्रम चार सत्रात आयोजित करण्यात आला.
1 पहिले सत्र –
सकाळी ठीक साडेनऊ वाजता धम्म ध्वजाचे ध्वजारोहण मेजर दत्तात्रय शिंदे व संजीवनीताई गडेराव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण व पंचशील घेऊन धम्म रॅलीला सुरुवात केली. धम्म रॅली सुरुवात श्रावस्ती बुद्ध विहार ते बोधी चौक, बोधी चौक ते पंचशील चौक, पंचशील चौक ते सुभेदार रामजी नगर कमान व मूलगंध कुटी बुद्ध विहार ते साठ फुटी रोड व परत श्रावस्ती बुद्ध विहार येथे पोहोचली. व प्रथम सत्र समाप्त.
2 दुसरे सत्र.
प्रमुख पाहुणे यांचे श्रावस्ती बुद्ध विहार या ठिकाणी आगमन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण तसेच प्रमुख पाहुणे प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड राज्ये संघटक भारतीय बौद्ध महासभा, यांचे स्वागत मिलिंद सोनकांबळे यांनी केले. व तसेच प्राध्यापक युवराज धसवाडीकर सर यांचे स्वागत आनंद डोणेराव यांनी केले. दीपक कांबळे यांचे स्वागत हिराचंद धायगुडे यांनी केले. राजेंद्र क्षीरसागर सर यांचे स्वागत राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले. प्राध्यापक प्रवीण कांबळे यांचे स्वागत दत्तात्रय शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र क्षीरसागर सर यांनी केले. प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राध्यापक युवराज धसवाडीकर सर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद डोणेराव तर आभार संजीवनीताई गडेराव यांनी मानले.
3.तीसरे सत्र-
तिसऱ्या सत्रात महिलांनी भोजनाची व्यवस्था केली होती. विक्रम नगर मधील उपासक-उपासिका यांनी श्रावस्ती बुद्ध विहार येथे भोजन ग्रहण केले.
4. चौथे सत्र-
चौथ्या सत्रात पूज्ये भदंत धम्मबोधी चैत्यभूमी दादर मुंबई यांचे श्रावस्ती बुद्ध विहार या ठिकाणी आगमन व लागलीच प्रवचनास सुरुवात. प्रवचन देत असताना श्रावस्ती या नावाने सुरुवात व तथागत बुद्धांनी जर सर्वात जास्त प्रवचन जर दिले असतील तर ते श्रावस्ती या ठिकाणी तब्बल 25 वेळा इथे प्रवचन दिले. प्रवचन देत असताना स्त्रीला त्रिरत्न असे तथागतांनी संबोधले. महामाया, महा प्रजापती, यशोधरा, भिमाई, रमाई हे स्त्रीरत्न होत. पुढे भन्ते म्हणाले की प्रत्येकांनी पंचशील ग्रहण केले पाहिजे व आपले शील जपले पाहिजे. भंते पुढे म्हणाले प्रत्येकाने विहारात गेले पाहिजे विहार हे मनातील विकार नष्ट करण्याचे ठिकाण असे भंते म्हणाले. शेवटी महिलांना संविधान ग्रंथ भेट देण्यात आले. या कार्यक्रमात प्रतिभाताई सावळे यांनी भंतेजी यांना चीवरदान केले. भंतेजींनी सर्वांसाठी आशीर्वाद गाथा घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद डोणेराव यांनी केले तर आभार राजेंद्र सूर्यवंशी यांनी मांनले. शेवटी धम्मपालन गाथेंनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.