रविवारी वीरशैव लिंगायत समाज बांधव लातूरच्या वतीने
राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन
लातूर : वीरशैव लिंगायत समाज बांधव लातूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजला गेलेला विनामूल्य समाजसेवेचा उपक्रम मागच्या १३ वर्षांपासून अविरतपणे चालू आहे.
लातूर शहरातील खंडोबा गल्लीमधील वीरशैव समाज सांस्कृतिक भवनमध्ये होणाऱ्या या मेळाव्यास आशीर्वाद देण्यासाठी अहमदपूरचे राजेश्वर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, भक्तीस्थळचे गुरुराज महाराज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिवा संघटनेचे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. शिवाजी काळगे , भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर , भाजपा नेत्या डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या सर्व उप वधू – वर आणि त्यांच्या पालकांसाठी संयोजकांच्या वतीने मोफत सोय करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही या मेळाव्यामध्ये नाव नोंदणी करणाऱ्या उप वधू – वरांच्या छायाचित्रांसह माहितीपुस्तिकाही प्रकाशित केली जाणार आहे. यावर्षीच्या मेळाव्यास नेहमीप्रमाणे वधू – वरांच्या पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीचे उद्दिष्ट्य दोन हजार निश्चित करण्यात आलेले असले तरी प्रत्यक्षात त्याहूनही अधिक उप वधू – वरांच्या नोंदणी होणार असल्याचे मेळाव्यास मिळणाऱ्या प्रतिसादावरून पाहावयास मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या मेळाव्यात १९०० नोंदी झाल्या होत्या. उपस्थित वधू – वरांना एकमेकांना प्रत्यक्षात पाहून, भेटण्याची संधी या निमित्ताने मिळते. रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा मेळावा पार पडणार आहे.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक उमाकांत कोरे, संयोजक अभिषेक ( तम्मा ) चौंडे, नागेश कानडे, अध्यक्ष बसवराज धाराशिवे , कार्याध्यक्ष राजाभाऊ हालकुडे , विश्वनाथ राचट्टे , स्वागताध्यक्ष दिलीप होनराव, पवनकुमार कल्याणी, उपाध्यक्ष सुनील भिमपुरे , शिवराज बुरांडे, कार्यवाहक बालाजी पिंपळे, बसवेश्वर हालकुडे, सचिव वैभव विभूते , महेश कोळळे , सतीश कानडे यांसह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
