भारतीय बौद्ध महासभेकडून पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण
लातूर प्रतिनिधी, दि.२५
शंभू नगर (सुभेदार रामजी नगर जवळ), लातूर येथे दिनांक १७.१०.२०२५ रोजी मनुवादी व्यक्तीने पंचरंगी ध्वज उतरवून तो फाडून अवमान केला होता.त्यामुळे त्याच दिवशी येथील सुजान नागरिकांनी संबंधित पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिनांक २६.१०.२०२५ रोजी सकाळी ९.०० पंचरंगी ध्वजाचे त्याच ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा आशाताई चिकटे व महिला जिल्हाध्यक्षा शारदाताई हजारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक प्रा.बापू गायकवाड उपस्थित होते.
प्रथम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित उपासक व उपसिका यांना त्रिसरण व पंचशील देण्यात आले. धम्मध्वज वंदना भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष हिराचंद गायकवाड यांनी घेतली.
याप्रसंगी समता सैनिक दलाचे असिस्टंट लेफ्टनंट जनरल राजाराम साबळे यांनी झालेल्या निंदनीय प्रकारचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच माणूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी गायकवाड व अभिमन्यू लामतुरे यांनी आपल्या मनोगतातून झालेल्या परिस्थितीचा निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा, तालुका, शहर व महिला शाखेसह सर्व पदाधिकाऱ्यासह हनुमंत जाकते प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय जाकते, प्रा. शिवाजी क्षीरसागर, वसंत चव्हाण, प्रा. विष्णू वेदे, प्रा. कल्याण कांबळे, नवनाथ जोगदंड, धोंडीराम कांबळे, महादेव गायकवाड, पांडुरंग निलंगेकर, विनय गवळी, अनंत गायकवाड, प्रमोद सरवदे, वैभव गवळी, भगवान पाचपिंडे, शिवगंगा चव्हाण, बबीता माकेगावकर, विद्या दोरवे, रत्नमाला जोगदंड, कमल कांबळे, वैशाली सरवदे, वैशाली निलंगेकर आदी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.
