December 8, 2025
100-min
जुन्या आठवणींना उजाळाःविविध पदावर विराजमन वर्गमित्रांच्या भेटीतून आनंद द्विगुणीत
लातूर- दि.27
             काळाच्या ओघात हरवलेल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी पुन्हा नव्याने उजळून निघाव्या यासाठी 1995-96 बॅचमधील विद्यार्थ्यांनी सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये एकमेकाला फोनद्वारे संपर्क करून माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा संकल्प बोलून दाखविला आणि एकमेकांच्या झालेल्या संपर्कातून ऐन दिवाळीच्या कालावधीत निसर्गाच्या सानिध्यातील “निसर्ग” येथे एकमेकांच्या विचारांची देवानघेवाण होऊन तब्बल तीस वर्षानंतर भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पळशी ता.रेणापूर जि.लातूर येथील विद्यार्थ्यांचा झालेला स्नेहमेळावा सर्व स्नेही मित्रांचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला आहे.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र जमलेल्या इयत्ता 10 वीच्या वर्गमित्रांनी शालेय जीवनातील गमतीजमती, शालेय जीवनातील किस्से अन् त्या काळातील आठवणी आपापल्या कलेच्या माध्यमातून शेअर केल्या. या हृदयस्पर्शी झालेल्या संवादातून अनेक वर्गमित्रांच्या डोळ्यात जुन्या आठवणींनी आनंदाश्रू तरळले, हास्य, आनंद आणि भावनांच्या मिश्र वातावरणामध्ये शाळेचा परिसर पुन्हा एकदा जुन्या आठवणीत गेल्या सारखा वाटत होता.
             या आमच्या वर्गमित्रांच्या यादीतील काही स्नेही आर्मी, पोलीस, वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगल्यापदावर कार्यरत झालेले आहेत तर काही वर्गमित्र प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, पत्रकारिता, शेती, फायणांन्स अशा सर्व क्षेत्रामध्ये सक्रियपणे कार्यरत राहून आपली प्रगती साधण्याचे काम आजही सक्षमपणे करीत आहेत. या स्नेह मेळाव्यामुळे 30 वर्षानंतरच्या आठवणी जाग्या झाल्या. यातील काही वर्गमित्र चांगल्या पदावर रूजू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला स्थिरता मिळाली असून त्यांचे पाल्यही संस्कारीत शिक्षण घेत असल्याचे त्यांच्या संवादातून उलघडले.या स्नेह मेळाव्याला  प्राध्यापक अरविंद घोडके, उद्योजक सुनिल गोयकर, पत्रकार बाळासाहेब जाधव, वाल्मिक उपाडे, संतोष कातळे, सतीश मोरे, महादेव मुंडे, संजय राठोड, शिवाजी नागरगोजे, अशोक गुंडरे, सुरेश जाधव, बळवंत जाधव, शामसुंदर जाधव, बालासाहेब खाडप, जयराम नागरगोजे, मुकींद जाधव, भगवान राठोड, संजय राठोड, बाळासाहेब राठोड यांच्यासह अनेक स्नेही मित्र उपस्थित होते.
               त्यावेळचे शिक्षण आता व्यावहारिक जीवनात उपयोगी ठरले !
तीस वर्षानंतर संपन्‍न झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यावेळी घरची परिस्थिती हालाखीची असतानाही पळशी गाव व परिसरातील विद्यार्थ्यांनी भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पायी चालत जाऊन शिक्षण घेण्यात काम केले. आता सर्व सुविधा असतानाही त्या तोडीचे शिक्षण देण्याचे काम होत नाही. परंतु त्यावेळी मिळालेल्या शिक्षण व  संस्कारातून व्यवहारिक जीवन प्रगल्भ झाले आणि यातील बरेच विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर कार्य करीत आहेत. अशा भावनाही काही विद्यार्थ्यांनी यावेळी संवाद साधताना व्यक्‍त केल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!