महाड येथे रिपाई आठवले गटाचा वर्धापन दिन
चाकूर – दि.२७
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा वर्धापन दिन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे दिनांक ०३ नोव्हेंबरला साजरा होणार आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी दिली आहे. कार्यक्रमास प्रदेक्षाध्यक्ष राजा सरवदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, गौतम सोनवणे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, मराठवाडा सचिव देविदास कांबळे, डॉ. सुधाकर गुळवे, बाबासाहेब कांबळे, मराठवाडा अध्यक्ष ब्रह्मानंद चव्हाण, अंकुश ढेरे, जितेंद्र बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष महालिंगे, तालुकाध्यक्ष चेतन महालिंगे यांनी केले आहे.
|
|
