December 8, 2025
Kavekar-min

स्टॅच्यु ऑफ नॉलेजला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शहर जिल्हा भाजपाच्या वतीने आनंदोस्तव
लातूर ( प्रतिनिधी )29 –

             शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात स्टॅच्यु ऑफ नॉलेज अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुटी पुतळा उभारण्यात येत आहे. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने लातूर शहर भाजपाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंदोस्तव साजरा करण्यात आला. सदर प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी विशेष आभार मानले आहेत.
             तत्कालीन खा. सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पेतून लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात स्टॅच्यु ऑफ नॉलेज अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुटी पुतळा उभारण्यात येत आहे. सदर पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली होती. सदर पुतळा उभारला जाऊ नये याकरिता विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मार्गाने अडचणी निर्माण करून विरोध दर्शवलेला होता. मात्र हा पुतळा उभारला जावा या करिता शहर जिल्हा भाजपासह अनेक संघटनांनी व भाजपा लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा केला होता. विशेषतः भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी सदर पुतळा उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळून तात्काळ निधी उपलब्ध व्हावा या करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्यास यश आले असून स्टॅच्यु ऑफ नॉलेजच्या उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळून पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. स्टॅच्यु ऑफ नॉलेजला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शहर जिल्हा भाजपच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिशबाजी करत आनंदोस्तव साजरा करण्यात आला.
             स्टॅच्यु ऑफ नॉलेज उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर झाला हा क्षण केवळ लातूरसाठीच नव्हे तर पुर्ण महाराष्ट्रसाठी आनंदाचा असल्याचे सांगून शहर जिल्हाअध्यक्ष अजित पाटील कव्हेकर म्हणाले कि या पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर तर पडणारच आहे पण त्याचबरोबर प्रत्येकाला राष्ट्रहिताची व सामाजिक ऐक्याची प्रेरणा सातत्याने मिळत राहणार आहे. सदर कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड यांचे आभार मानून स्टॅच्यु ऑफ नॉलेज उभारण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच ज्या ज्या संघटनांनी पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. लवकरच पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल असा विश्वास शहर जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
              हा आनंदोस्तव साजरा करताना शहर जिल्हा सरचिटणीस संजय गीर, निखील गायकवाड, प्रविण कस्तुरे, महिला मोर्चा अध्यक्षा शितल मालू युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरणे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे, किसान मोर्चा अध्यक्ष तानाजी झुंजे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मुन्ना हाश्मी, मंडल अध्यक्ष सुरेश जाधव, निर्मला कांबळे, राहुल भुतडा, रोहित पाटील, गोपाळ वांगे, व्यंकटेश कुलकर्णी, श्रीकांत रांजणकर, उदय देशपांडे, मधुसदन पारीख, दत्ता चेवले, रविशंकर केंद्रे, बाबा गायकवाड, विनय जाकते, किशन बडगीरे, धनंजय हाके, राजू सोनवणे, किशोर काळे, अतिश कांबळे, शैलेश भडीकर, मोहसीन शेख, अमजद पठाण, शितल पाटील, रत्नमाला घोडके, अर्चना आल्टे, राहुल कांबळे, विजय अवचारे, किशोर शिंदे, सचिन कांबळे, सागर घोडके, रमण लातुरे, संतोष तिवारी, श्रीनिवास मेनकुदळे, शिवशंकर कावळे, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!