आदर्श मैत्री फाउंडेशन च्या वतीने शेतकऱ्यांस खते बियाणांचे वाटप
लातूर-29
नुकत्याच झालेल्या आसमानी संकटामुळे हतबल झालेल्या 25 शेतकऱ्यांना मदतीचा हात नव्हे तर कर्तव्य समजून त्यांना खत बी बियांचे वाटप आदर्श मैत्री फाउंडेशन च्या वतीने आज करण्यात आले. सध्या निसर्ग शेतकऱ्यावर कोपलेला दिसत आहे, अशा परिस्थितीत शेतकरी हतबल होऊन टोकाचे पाऊल उचलत आहेत, अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही आदर्श मैत्रीच्या वतीने मदत नव्हे तर कर्तव्य समजून त्यांना हरभरा व गहू बियाण्याचे बॅग व खत वाटप आज करत आहोत. याशिवाय भविष्यात तुमची मुले उच्च शिक्षण घेत असतील त्यांना काही अडचण असेल तर त्यासाठीही सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मत फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी प्रस्ताविकात व्यक्त केले. हा उपक्रम संपूर्ण लातूर वाशियांच्या सहकार्यातून नेटिजन्स फाउंडेशन स्कूल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जमवलेल्या मदत फेरीच्या निधीमधून त्याचबरोबर फाउंडेशनच्या सर्व संचालकाच्या सहकार्यातून होत असल्याचे मत प्रा सुधाकर तोडकर यांनी यावेळी व्यक्त केले.
आदर्श मैत्री संस्था ही नेहमीच गोरगरीब वंचितांच्या पाठीशी उभे राहणारे संस्था आहे यामधील सर्व संचालक सामाजिक बांधिलकी जपणारे असून समाजातील तळागाळातील लोकांची नाळ जोडलेले आहेत त्यामुळे त्यांना समाजातील सर्वच प्रश्नांची जाणीव आहे आणि त्या जाणिवेतूनच समाज उपयोगी असे अनेक उपक्रम ते घेत असतात असे मत समाज कल्याणचे उपायुक्त अविनाश देवसटवार साहेब यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी नायब तहसीलदार गणेश सरोदे प्राचार्य निलेश राजमाने सोनू डगवले यांच्यासह उपस्थित आपत्तीग्रस्त शेतकरी व महिला शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास समाज कल्याणचे विभागीय उपायुक्त अविनाश देवसरकर साहेब नायब तहसीलदार गणेश सरोदे आदर्श मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष बिराजदार फाउंडेशनचे संचालक प्रा शिवराज मोठेगावकर, पत्रकार शशिकांत पाटील, प्राचार्य निलेश राजमाने, सुधाकर तोडकर, विवेक सौताडेकर, महेश तोडकर सोनू डगवाले, प्रमोद भोयरेकर, संभाजी नवघरे, प्रवीण सूर्यवंशी संपत जगदाळे, सितम सोनवणे, मदन भगत, ज्योतीराम कुमठे, कुमार शिंदे, सुदर्शन लकडे यांच्यासह शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी नवघरे यांनी केले तर आभार शशिकांत पाटील यांनी मानले.
