लातूर जिल्हाधिकाऱ्यांना वंचितचे निवेदन सादर
लातूर (दि.६), प्रतिनिधी-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ‘गॅस सिलेंडर’ निशाणी आरक्षित ठेवणेसाठी लातूरचे जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी हा नोंदणीकृत राजकीय पक्ष असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकीत आमच्या वंचित बहुजन आपाडी या राजकीय पक्षाच्या वतीने उभे राहणाऱ्या सर्व उमेदवारांकरिता ‘गॅस सिलेंडर ही निशाणी आरक्षित करावी. मागील दोन्ही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांना ‘गॅस सिलेंडर’ ही निशाणी आरक्षित करण्यात आली होती. भारत निर्वाचन आयोग सचिवालयाचे संदर्भ क्र. No.56/Symbol/2024/PPS-11/Vol. XXXI/Dated: 14th August, 2024 तसेच मा. निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग यांना दिनांक 14/10/2025 रोजी दिलेले पत्र (संदर्श क्र. 10-2025/194) या पत्राची प्रत सोबत जोडून विनंती करण्यात आली आहे.
निवेदनावर सलीम सय्यद जिल्हाध्यक्ष लातूर, ॲड. रोहित सोमवंशी जिल्हा महासचिव, इंजि. सचिन गायकवाड लातूर शहर अध्यक्ष, आकाश इंगळे शहर महासचिव, नितीन गायकवाड युवा जिल्हा अध्यक्ष, अमोल बनसोडे कामगार जिल्हा अध्यक्ष, आनंद वाघचौरे युवा जिल्हा उपाध्यक्ष इत्यादींच्या सह्या आहेत.
