माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची निलंगा शहर काँग्रेस अध्यक्षाच्या निवासस्थानी भेट; नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीचा घेतला आढावा
लातूर(२०) प्रतिनिधी,
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी निलंगा शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन निलंगा नगरपरिषद निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे आणि निलंगा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजित नाईकवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून निलंगा नगर परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी निलंगा नगरपरिषदेचे काँग्रेसचे प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार अजित नाईकवाडे आणि मनीषा सुनील नाईकवाडे यांच्या शिवाजी नगर, हाडगा रोडवरील संपर्क कार्यालयालाही भेट दिली. त्यांनी उमेदवारांकडून प्रभागाची माहिती जाणून घेतली आणि उत्तम प्रचार यंत्रणा राबवण्याच्या सूचना केल्या.
