यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने 27 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यस्तरीय यशवंत-वेणू सन्मान गौरव पुरस्कार वितरण सोहळा
लातूर दि.20-11-2025
पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी कृषी, शैक्षणिक, सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार दिले जातात. यामध्ये आतापर्यंत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, दिलीप वळसे पाटील, डॉ.पी.डी.पाटील, यशवंतराव गडाख, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पोपटराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, ना.धो.महानोर, विठ्ठल वाघ, रावसाहेब शिंदे, बाळासाहेब विखे पाटील, चंद्रकांत दळवी, श्रीनिवास पाटील, उल्हासदादा पवार अशा महान व्यक्तिंना देण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर यंदाही या ऐतिहासिक पुरस्काराची घोषणा यंशवतराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केली असून यावर्षीचा यशवंत-वेणू राज्यस्तरीय सन्मान गौरव पुरस्कार भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना जाहीर झालेला आहे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांना यशवंतराव चव्हाण सह्यादी भलामाणूस पुरस्कार, विशाल पलांडे यांना यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे वितरण 27 नोव्हेंबर 2025 रोजी गुरूवारी दुपारी 03.00 वा मुंबई पुणे रस्ता, पिंपरी चिंचवड, पुणे-19 येथील सायन्स पार्क समोरील अॅटो क्लस्टर सभागृहामध्ये करण्यात येणार आहे.
यशवंत-वेणू पुरस्कार वितरण सोहळा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबणीस यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे प्रभारी कार्यवाहक सुनिताराजे पवार, नारायण सूर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, श्रमश्री बाजीराव सातपुते आदी मान्यवरांची उपस्थित राहणार आहे. तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले पाटील, उपाध्यक्ष अरून गराडे, निमंत्रक इंद्रजीत पाटोळे, समन्वयक राजेंद्र वाघ, समन्वयक संगिता झिंजुरके, रजणी कानडे, प्रसिध्दी प्रमुख प्रतिमा कावळे, जयवंत भोसले, वर्षा बालगोपाल, प्रभाकर वाघोले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेले आहे.
