लातूर केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धा १७ नोव्हेंबरपासून
१३ नाट्य संघांचा समावेश, नाट्य रसिकांसाठी असणार मेजवानी
लातूर : प्रतिनिधी
हौशी नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांची उत्कंठा वाढवणाºया ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा लातूर केंद्रावर दि़ १७ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे़ या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील १३ नामवंत नाट्य संघांचा समावेश आहे़ ३० नोव्हेंबरपर्यंत रंगणारी ही नाट्य स्पर्धा दर्दीनाट्य रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी असणार आहे़
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित या नाट्य स्पर्धेतील दररोज एका नाटकाचा प्रयोग शहरातील मार्केट यार्डातील स्व़ दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात दररोज सायंकाळी ७ वाजता असून नाट्य कलावंत आपली विविध विषयांवरील मनोवेधक नाटकं सादर करणार आहेत़
सांस्कृतिक कार्यमंंत्री अॅड़ आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ़ किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली़ या स्पर्धेचा नाट्य रसिकांनी उपस्थित राहून हौशी नाट्य कलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे़
या स्पर्धेत, रे शुन्य म्हणा (अ़ भा़ म़ ना़ परिषद शाखा लातूर), अंतरछिद्र-द ब्लॅक होल(दर्पण मराठी पत्रकार संघ लातूर), महानिर्वाण (दयानंद शिक्षण संस्था लातूर), बेईमानी (धर्मवीर राजे प्रतिष्ठन उदगीर), रातमतरा(डॉ़ संतुक लाड चॅरिटेबल ट्रस्ट लातूर), घाट (कै़ ग्यानोबा शिवराम कोटंबे बहु़ सेवाभावी संस्था, हिप्पळनेर), टेडी बिअर (कलारंग लातूर), इथे ओशाळला मृत्यू (माजी विद्यार्थी संघ जयक्रांती अध्यापक महाविद्यालय लातूर), आंबेडकरीझम् (सम्यक बहु़ सेवाभावी ज्ञान प्रसारक मंडळ लातूर), विठ्ठला (सविर प्रतिष्ठान लातूर), दास्ताँ(सुधाकरराव कुलकर्णी स्मृति प्रतिष्ठान लातूर), उन्हातलं चांदणं (सूर्योदय बहु़ सेवाभावी संस्था लातूर), संकेत मीलनाचा (उन्नती फाऊंडेशन लातूर) या नाटकांचा समावेश आहे़.
