भारतीय बौद्ध महासभा लातूरच्या वतीने धम्म दीक्षा संपन्न
लातूर (५)/ प्रतिनिधी-
लातूर शहरातील विक्रम नगर येथील श्रावस्ती बुद्ध विहार या ठिकाणी काल कार्तिक पौर्णिमेनिमित्त धम्म दीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त लातूर शहरातील विक्रम नगर परिसरातील एकूण १७ जणांनी धम्म दीक्षा घेतली.
धम्म दीक्षा समितीचे प्रमुख लातूर जिल्हा प्रमुख राहुल गायकवाड यांच्या हस्ते तसेच उपप्रमुख सदानंद कापुरे आणि जिल्हा संघटक डॉ. लालासाहेब बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर उपस्थित विजया अमोल दरकसे, भूषण अमोल दरकसे, चेतन अमोल दरकसे, राजनंदिनी चेतन दरकसे, आदित्य भूषण दरकसे, सिद्धार्थ भिवाजी सूर्यवंशी, जयश्री सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रथमेश सिद्धार्थ सूर्यवंशी, अर्चना प्रथमेश सूर्यवंशी, दत्तात्रय संभाजी अडसुळे, आशा दत्तात्रय अडसुळे, संभाजी दत्तात्रय अडसुळे, विवेक दत्तात्रय अडसुळे, पल्लवी दत्तात्रय अडसुळे, सुरज दत्तात्रय अडसुळे. भीमराव किसनराव लोखंडे, केशरबाई भिमराव लोखंडे इत्यादीना बौद्धाचार्य आनंदराव डोनेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या त्यानंतर विधिवत त्रिसरण-पंचशील ग्रहण करायला लावले.
समितीचे प्रमुख राहुल गायकवाड यांनी दीक्षितांना धम्म पालनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दीक्षित कुटुंबाना दीक्षा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन आनंद डोणेराव यांनी केले तर शुभेच्छासह आभार सदानंद कापुरे यांनी मानले. शेवटी धम्मपालन गाथेंनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
