December 8, 2025
Pariksha

भूमी अभिलेख विभागाची 13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा

लातूर, दि. 6  :

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता 1 ऑक्टोबर, 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार 1 ते 24 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकृतीचे कामकाज करण्यात आलेले आहे. या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (काँम्प्युटर बेसड टेस्ट) 13 ते 14 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांच्या परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेस्थळावर https://mahabhumi.gov.in या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेस्थळावर देण्यात आलेल्या सूचनानुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवरांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही.

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 मे, 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीने (काँम्प्युटर बेसड टेस्ट) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराच्या परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

परीक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिताची लिं‍क विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे भूमि अभिलेखचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक डॉ. सुहासे दिवसे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!