भारत एकसंघ ठेवायचा असेलतर हिंदू राष्ट्रवाद नव्हे भारतीय राष्ट्रवादाचा प्रसार करावा लागेल-ॲड. एस. के. भंडारे
मुंबई –
भारतात अनेक जाती, धर्म असून भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र सरकारला कोणताही विशिष्ट धर्म नाही. त्यामुळे सरकारने कोणत्याही धर्माचा प्रचार प्रसार करता कामा नये असे संविधानाने ठरवलेले आहे परंतु सरकार मधले काही लोक हिंदू राष्ट्रवाद याचा प्रचार प्रसार करत आहे. त्यामुळे समाजात धार्मिक द्वेषाचे वातावरण वाढत चालले आहे .या पार्श्वभूमीवर सरकारने भारत एक संघ राहण्यासाठी भारतीय राष्ट्रवादाचा प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे.
अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी संभाजीनगर येथे आरएसएस च्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून त्यांची आरएसएस ही संघटना नोंदणीकृत नाही भारतीय संविधानाला मानत नाही आणि देशाचा तिरंगा सुद्धा मानत नाही त्यामुळे त्यांनी भारतीय संविधान, संस्था नोंदणी कायदा व तिरंगा संघाला भेट देण्यासाठी आणला होता परंतु त्यांचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित झाले नसल्याने सुजात आंबेडकर यांनीती भेट, त्यांना देण्यासाठी पोलिसांच्याकडे दिली अशी माहिती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्ट राष्ट्रीय राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी अंगुलीमाल बुद्ध विहार,सुमन नगर, चेंबूर येथील दिनांक 21/10/2025 पासून दिनांक 25/10/2025 पर्यंत पाच दिवस चाललेल्या बाल श्रामनेर शिबिराच्या समारोप प्रसंगी दिली असता वंचित बहुजन आघाडी व सुजात आंबेडकर यांनी काढलेल्या मोर्चा बद्दल उपस्थितांनी प्रचंड टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन केले.
ॲड. भंडारे पुढे असे म्हणाले की, भगवान बुद्ध सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि त्यांनी निर्माण केलेली बौद्ध विरासत याचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे . चातुवर्णाच्या जातीयतेमुळे मागासवर्गीय असलेले तत्कालीन राष्ट्रपती महोदय रामनाथ कोविंद व विद्यमान राष्ट्रपती महोदया यांना संसद भवन च्या भूमिपूजन/उद्घाटन या कार्यक्रमात बोलण्यात आले नाही. नुकतेच सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याशी अंगावर भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न झाला एवढेच नाही पूर्वी चातुवर्णाच्या जातीयतेमुळे छत्रपती शिवाजी महाराज ,
छत्रपती शाहू महाराज ,छत्रपती सयाजीराव गायकवाड ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रास झालेला आहे याची आपणास कल्पना आहे. संविधानाच्या माध्यमातून समानता प्रस्थापित झालेली असताना समतेच्या विरोधकांचे त्याच्या विरोधात काम चालू आहे त्यामुळे संविधान समर्थकांनी एकत्र येऊन समतेचा लढा लढणे आवश्यक आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल ॲड बाळासाहेब आंबेडकर,डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढा लढत असून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ॲड एस के भंडारे यांनी केले.
यावेळी श्रामनेर भंते राहुल बोधी यांनी राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष विलास ढोबळे, मुंबई प्रदेशचे सचिव सुनील बनसोडे,झोन पाच च्या अध्यक्ष मनीषाताई साळवे, इत्यादीने आपल्या विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुंबई प्रदेश दोन पाच चे अध्यक्ष अनंत जाधव होते सूत्रसंचालन संस्कार उपाध्यक्ष शामराव वाकोडे यांनी केले. या बाल श्रामनेर शिबिरात 23 मुले बसले होते. समारोप कार्यक्रमात झोन क्रमांक 5 मधील शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिबिरातील मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
