महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड (दक्षिण) च्या निवड समिती जिल्हाध्यक्षपदी सुनील पाटील चव्हाण…
लोहा तालुका अध्यक्षपदी गणपतराव जामगे यांची निवड
लोहा (1)/प्रतिनिधी-
मराठी राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड (दक्षिण)च्या निवड समिती जिल्हाध्यक्षपदी सुनील पाटील चव्हाण तसेच तालुका अध्यक्षपदी गणपतराव पाटील जामगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.
लोहा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ निवड समितीचे प्रदेशाध्यक्ष रुपेशजी पाडमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर बैठकीमध्ये रुपेशजी पाडमुख यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा निवड समितीच्या अध्यक्षपदी युवा पत्रकार सुनील पाटील चव्हाण तसेच संघटनेच्या लोहा तालुका अध्यक्षपदी गणपतराव पाटील जामगे यांची रुपेश पाडमुख व मोहन पाटील पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे गठित करण्यात आले तालुकाउपाध्यक्षपदी
प्रदीप कुमार कांबळे, सचिव पदी हनुमंत पांचाळ तर सदस्यपदी माधव ससाने, संग्राम चव्हाण, सिद्धार्थ महाबळे, शरद कापुरे,रवी जोंधळे व सल्लागार पदी विलास सावळे यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन संघटनेचे काम जोमाने करून संघटन गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे तसेच संघटनेच्या माध्यमातून
कुठल्याही अडीअडचणीला सामोरे जाण्यास सज्ज राहावे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या प्रत्येक सदस्याचा वार्षिक दोन लक्ष रुपयाचा विमा ही उतरवला जाणार आहे असे पाडमुख यांनी सांगितले.
सदर बैठकीस रुपेशजी पाडमुख यांच्यासह जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार जिल्हा उपाध्यक्ष आयुब खा पठाण तसेच सिडको सेलचे अध्यक्ष शेख मोहम्मद कलीम लोह्यातील पत्रकार बांधव व पुरोगामी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजीव तिडके सर यांची उपस्थिती होती.
सदर निवडीबद्दल सामाजिक राजकीय स्तरातून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे सदर बैठकीचे सूत्रसंचलन सिद्धार्थ महाबळे यांनी केले व आभार पत्रकार प्रदीप कुमार कांबळे यांनी व्यक्त केले.
