भारतीय बौद्ध महासभेस संजय गायकवाड यांच्याकडून धम्म कार्यास आर्थिक दान
लातूर (1) प्रतिनिधी-
भारतीय बौद्ध महासभेच्या धम्म कार्यास प्रभावीत होऊन लातूर तालुका संघटक आयु. संजय गायकवाड गुरुजी यांच्या मुलाचे लग्न दिनांक १० नोव्हे. रोजी लातूर येथे आयोजित केले आहे. त्या मुलाच्या लग्नात स्वागत, सत्कारासाठी होणार अनावश्यक खर्च टाळून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, लातूर या मातृसंस्थेला धम्म कार्यासाठी 8000/- रुपयांचे दान दिले आहे. ते दान स्वीकारताना जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे, सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे, डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा हिशोब तपासणीस राजाभाऊ उबाळे, धम्मदीक्षा समितीचे प्रमुख राहुल गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आशाताई चिकटे म्हणाल्या, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर च्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या २४ शिबिराचे आयोजन करण्यात येते. या सर्व शिबिराचे आयोजन उपासक-उपासिकांच्या दानातून केले जाते. दानाची परंपरा बुद्ध काळापासून चालत आलेली आहे. तत्कालीन राजे, महाराजे व उपासक- उपासिका यांच्या दानामुळेच आजवर धम्म टिकून असल्याचे सांगून आपणही आपल्या आयुष्यात होणारा अनावश्यक खर्च टाळून धम्म कार्यास मदत करावी, असे आवाहन केले.
माजी शिक्षण विस्तार अधिकारी तसेच संस्थेचे जिल्हा सचिव प्रेमानाथ कांबळे सर यांनी संस्थेच्या वतीने संजय गायकवाड गुरुजी यांचे व त्यांच्या परिवाराचे मनापासून आभार मानले व मंगल कार्यास शुभेच्या दिल्या.
