हजार निरर्थक गाथा पाठ करण्यापेक्षा एकच गाथा अर्थासहित पाठ करणे सर्वश्रेष्ठ
सुंदरीची कथा
राज राजगृहातील एका व्यापाऱ्याला सुंदरी नावाची एक सुंदर मुलगी होती. त्यांनी आपल्या मुलीसाठी सात मजली राजमहाल बांधला होता. आणि तिची व्यवस्था सातव्या मजल्यावर केली होती .
परंतु तिचे आयुष्य आरामाचे जीवन अधिक काळ मिळाले नाही. राजगृहात एकदा एका चोराने चोरी केली . त्याला सैनिकांनी पकडले चाबकाचे फटके मारत त्याला ते आणत होते. या सुंदरीच्या राजमहाला जवळ आणण्यात आले. खूप गर्दी झाली सुंदरीने आपली खिडकी उघडून पाहिले जो चोर होता तो तिचा प्रियकर होता.
तिने जेवण सोडून दिले आणि नुसती रडत बसायची आपल्या वडिलांना सांगू शकत नव्हती. परंतु ती गोष्ट तिने आपल्या आईला सांगितली तिच्या आईने आपल्या नवऱ्याला सांगितले. तो व्यापारी म्हणाला. काही झाले तरी चालेल. मी मोठा व्यापारी आहे आपल्या मुलीने एखाद्या राजकुमारासोबत लग्न करावे तिचे लग्न मी धुमधडाक्यात लावून देईन हे बोलणे तिच्या आईने मुलीला सांगितले .
आपल्या पित्याचे बोलणे ऐकून सुंदरीने जेवण सोडले. ती फक्त बिछान्यावर झोपून राहायची असे पाच दिवस उपाशी राहिली. शेवटी बापच तो त्याला आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. मग त्याने आपल्या मुलीला समजावले. मी काहीतरी करतो. परंतु तू जेवण सोडू नकोस.
आपल्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी वडिलांनी एक शक्कल लढवली. एक दुसरा चोर शोधला त्याला हजार मुद्रा दिल्या आणि ज्या सैनिकाच्या ताब्यात जो चोर होता त्यालाही हजार मुद्रा दिल्या आणि त्याची सुटका करण्यास सांगितली आणि या चोराला त्याच्या ताब्यात दिले.
आपल्या मुलीचा प्रियकर सुटल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात लावून दिले. दोघांचा संसार सुरू झाला .सुंदरी नवऱ्याची खूप काळजी घ्यायची. त्याने मागितलेले किती पैसे ती त्याला द्यायची. त्यामुळे तू खुश होता.
काही दिवसांनी त्या चोराच्या मनात वेगळाच विचार आला. आपण काय रोज रोज बायकोकडे पैसे मागायचे त्या पेक्षा आपण सर्व दागिने चोरून निघून जावे आणि मस्त आरामात राहावे हिला काहीतरी सांगून कुठेतरी घेऊन जाऊया. तिचे संपूर्ण दागिने घेऊया आणि तिला मारून टाकूया. असा विचार त्याच्या मनात आला. परंतु याच गोष्टी जर त्याने सुंदरीकडे मागितले असत्या तर तिने आपल्या प्रेमाखातर या सर्व गोष्टी केल्या असत्या.
त्याने आपण आजारी असल्याचे बहाणा केला आणि तो झोपूनच राहू लागला. तेव्हा सुंदरी मी त्याला विचारले तुम्हाला माझे आई-वडील काही बोलले का? दुसरे कोणी काय बोलले का? ते मला सांगा? माझ्याकडून काही चुकले का? तुम्ही दुःखी का आहात .
त्यांनी सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरे दिली आणि तो तिला म्हणाला मला जेव्हा सैनिकाने चोर म्हणून धरले होते. तेव्हा मी देवीला नवस केला होता. मी जर यातून सुटलो तर तुझा नवस फेडेन. तांदळाची खीर, पाच प्रकारची फुले, एक खण, एक नारळ. तो मला फेडावा लागेल.
सुंदरी म्हणाली. एवढेच ना? काही काळजी करू नका. मी हे सर्व काही करीन. तुम्ही निरोगी राहण्यासाठी मी काय पण करेन.
एवढेच नव्हे मी माझ्यासोबत माझ्या बायकोला घेऊन येईन असे देखील तिला बोललो होतो. त्यासाठी तुला देखील यावे लागेल आणि आपण दोघांनी जायचं आहे. अगदी संध्याकाळच्या वेळी, कोणी नसताना जायचं आहे.
तिने ते कबूल केले आणि ती दोघं नवस फेडण्यासाठी जातात. त्या देवीचे मंदिर उंच डोंगरावर होते देवीच्या मंदिरापाशी जवळ जाताच तो सुंदरीला म्हणाला. सुंदरे तुझे सगळे दागिने काढून माझ्याकडे दे
सुंदरीने विचारले का बरे?
तो म्हणाला. या देवीला सोन्याचे दागिने चालत नाही .तिने काही विचार न करता दागिने काढून दिले ती दोघे उंच पहाडावर थांबली तो चोर तिला म्हणाला. मी देवीला नवस वगैरे काही बोललो नव्हतो. मला फक्त तुझे दागिने पाहिजे होते आणि म्हणून ते आता काढून घेतले आहेत. आता तुला मी या कड्यावरून फेकून देणार आहे .
आपल्या पतीचे बोलणे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोक्यात असा विचार आला त्याचा जीव वाचवण्यासाठी माझ्या बापाने दोन हजार मुद्रा दिल्या आणि याला सोडवले. माझे वडील मला याच्या बरोबर लग्न करू नकोस असे सांगत होते तरी मी याच्याशी लग्न केले. मी याच्यावर खूप प्रेम केले परंतु त्याला माझे प्रेम समजलेच नाही. त्याला दागिनाच पाहिजे होता तर मी दिला असता. माझी सात मजली इमारत देखील त्याच्या नावावर केली असती. परंतु हा तर माझा जीव घ्यायला निघाला आहे. आता यातून वाचायचे असेल तर आपल्याला घाबरून काही उपयोग नाही. ती थोडीशी सावरली आणि त्याला म्हणाली. पतीराया, मी तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करते .माझी शेवटची एक इच्छा आहे ती पूर्ण करा आणि नंतर तुम्हाला जे काय करायचे असेल. ते करा, मला ठार मारा मला फक्त तुम्हाला एकदा मिठ्ठी मारायची आहे. आणि फक्त तुम्ही या दरीच्या बाजूला असे उभे रहा मी इकडे उभे राहते आणि तो खरच त्या दरीच्या बाजूला उभा राहिला आणि मिट्टी मारण्याच्या बहाण्याने त्याने त्याला दरीत खाली ढकलून दिले आणि सुंदर वाचली.
ती मनाने खूप दुःखी झाली. ज्याच्यावर मनापासून अपार प्रेम केले. त्यानेच माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला.मनात विचार करू लागली. जगावे कोणासाठी ? ज्याच्यासाठी मी सर्व काय केले तोच माझ्या प्राणावर टपला होता. आई-वडिलांकडे गेले तर ते पण रागवतील. या सर्व गोष्टीचा विचार करून ती डोंगर उचलून खाली आली आणि आता आपण घरी न जाता संन्याशी होऊन जीवन जगावे असा निर्णय घेतला. तिने पाहिले बाजूलाच एक जैन साधूंचे मंदिर आहे. दिगंबर पंतांचे. ती तेथे गेली आणि जैन धर्माची दीक्षा घेतली. अगदी थोड्या दिवसात तिने जैन धर्माचे सारे तत्त्वज्ञान मुखोद्गगत केले तिचे कुंडलीकेशा भद्रा असे नाव ठेवण्यात आले. तिने मोठमोठ्या जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाना हरवले. जैन धर्माच्या एका तत्त्वज्ञानाने तिला एक जांभळाची काठी दिली. जा प्रत्येक जनपदात आणि वाद विवाद करून सर्वांना हरव आणि जैन धर्माचा प्रचार ,प्रसार कर. त्याकाळी जम्बुदीपामध्ये एकूण सोळा जनपदे होती. ती प्रत्येक जनपदांमध्ये जाई आणि जैन धर्माचा प्रसार करी आणि तेथील विद्वानांशी चर्चा करी. आणि वादविवाद त्यांना हरवत असे. जिकडे जिकडे ही जैन साध्वी प्रसिद्ध झाली होती.
एकदा ती अशीच श्रावस्तीमध्ये गेट जवळ आली आणि जांभळाची काठी रोवून ठेवली त्या जांभळ्याच्या काठीचा नियम होता जर ती जांभळाची काठी तिने रोवून ठेवली. त्या काठीचा एक नियम होता की, काठी तिथेच असेल तर या जनपदामध्ये वाद विवाद होणार नाही आणि ती काठी जर दुसऱ्या ठिकाणी ठेवली तर वादविवाद होऊ शकतो .
सारीपुत्र त्याचवेळी तेथे आले त्यांनी ती काठी उचलली. दुसऱ्या ठिकाणी ठेवली आणि भिक्षाटन करून तेथेच परत आले. तेव्हा त्याला कुंडलीकेशा भद्रा दिसली. तिला तो म्हणाला मी ती काठी उचलून त्या ठिकाणी ठेवली आहे.
तेव्हा ती म्हणाली आज मला बुद्ध पुत्र वादविवाद करण्यासाठी मिळाला.
इकडे सारीपुत्र तथागत बुद्धांचा प्रमुख शिष्य आणि कुंडलीकेशा भद्रा एक जैन साध्वी यांच्यामध्ये वाद विवाद चर्चा रंगली. पाहून श्रावस्ती दंगली. श्रावस्तीची सर्व लोक ती ऐकण्यासाठी जमा झाली होती कुंडलीकेशा भद्राने सारीपुत्रांना अनेक प्रश्न विचारले तर सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सारीपुत्राने दिली. तिचे प्रश्न संपल्यानंतर सारी पुत्राने तिला एकच प्रश्न विचारला एकं नाम ति. तिने उत्तर दिले या प्रश्नाचे उत्तर मला माहित नाही. कारण तिने फक्त जैन धर्माचा अभ्यास केला होता. त्यामुळे तिला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. आणि ती सारी पुत्राना म्हणाली. याचे उत्तर तुम्ही मला सांगावे. सारी पुत्र तिला म्हणायला मी उत्तर सांगतो पण त्याआधी तुला चिवर परिधान करावे लागेल पण त्यासाठी आपण तथागत बुद्धांकडे जाऊया ती दोघेही जेतवनात गेली. तिला बुद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली आणि दीक्षा झाल्यावर तिने सारीपुत्राला प्रश्न विचारला. एकं नाम ती सारीपुत्राने सब्बे सत्ता आहार तिट्ठी का एकं नाम की म्हणजे सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी भोजन आवश्यक आहे.
त्यानंतर तथागत बुद्धाने प्रवचन दिले ते ऐकून खूप आनंदी झाली त्यावेळी तथागत बुद्धाने धम्मपदातील 102 आणि 103 गाथा म्हटल्या.
102 गाथेचा मराठीत अर्थ अनेक अनर्थकारी पदांनी युक्त असलेल्या शेकडोगाथा जरी कुणी गायल्या. तरी धम्माचे एकच पद श्रेष्ठ आहे जे अर्थासहित समजून घेतले तर ऐकून माणसाला शांती प्राप्त होते.
103 नंबर गाथेचा अर्थ आहे संग्रामात हजार पटीने हजार माणसांना जिंकतो तो खरा संग्राम वीर नाही जो स्वतः विकार मुक्त आहे तोच करा संग्राम विजेता असतो.
संजय सखाराम पवार
खांडोत्री
तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी
मोबा.9137440340
