संघ सेनापती अरहंत भन्ते सारीपुत्त यांचे परिनिर्वाण व कार्तिक पौर्णिमा निमित्त व्याख्यान संपन्न
औसा(2) प्रतिनिधी-
विश्वशांती बुद्ध विहार सारोळा ता. औसा जि. लातूर येथे दिनांक २ नोव्हे. रोजी संविधान समर्थक समाज जोडो अभियानातर्गत सारोळा येथे बुद्ध धम्माचे संघ सेनापती अरहंत भन्ते सारीपुत्त यांचे कार्तिक पौर्णिमाला परिनिर्वाण झाले होते. या दिनाचे औचित्य साधून सकाळी 9.00 वाजता बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयक सल्लागार समितीचे तालुका उपप्रमुख आयु. ॲड. जयराज जाधव यांनी संविधान व समता सैनिक दलाचे महत्व या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी लातूर जिल्हा सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे यांनी कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व सांगून कश्यप बंधूची व त्यांच्या शिष्याची धम्मदीक्षा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या ग्राम शाखेची स्थापना झाली आहे.
या शाखेच्या सैनिकाचे साप्ताहिक परेड प्लाटून कमांडर रवी कांबळे, औसा तालुकाप्रमुख श्याम सुरवसे, सचिव रंगनाथ कांबळे यांनी घेतले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कायदेविषयक सल्लागार समितीचे तालुका प्रमुख ॲड. धम्मदीप डांगे यांनी केले. तर सूत्रसंचालन तालुका कोषाध्यक्ष मारुती कांबळे यांनी केले व आभार दयानंद गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी सारोळा येथील बौद्ध उपासक-उपासिका व मुला मुलींची प्रमुख उपस्थित होती. भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा सारोळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट सरणतय या गाथेने झाला.
