December 8, 2025
Adv. Dhavan Patil (2)-min
सावरगांव खुन प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने केले दोष मुक्त
लातूर(2) :
        सावरगाव खुन प्रकणातील आरोपी विकास हिंगे, कैलास हिंगे व सतिष कांबळे यांच्यावर कलम 302, 201, 120 (ब) भा.द.वि. नुसार जिल्हा लातूर न्यायालयात प्रकरण सुरु होते. 31 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायधिश श्री एस. जे. बारुखा यांनी सबळ पुराव्या अभावी वरील नमूद आरोपींची सदरील प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत की, किशोर घुटे रा. कवठा यांनी 17 मार्च 2021 रोजी मुरुड पोलिस स्टेशन मध्ये आरोपी यांनी भागवत घुटे यांचे आरोपीच्या आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून भागवत घुटे हे त्यांच्या पत्नीला आणण्यासाठी खंडापूरला जात असताना 16 मार्च 2021 रोजी संध्याकाळी च्या सुमारास सावरगाव शिवारातील महेश शिंदे यांच्या शेतात भागवत धुटे याचा निघृण हत्या केल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यावर मुरुड पोलिस स्टेशन यांनी तपास करुन अरोजी विरुध्द मा. जिल्हा न्यायालय लातूर येथे दोषारोप पत्र दाखल केले होते.
       सरकार पक्षाकडून एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. परंतू साक्षीदाराच्या जबानीत विसंगती असल्यामुळे व आरोपी विरुध्द सबळ पुरावा आला नसल्यामुळे आरोपी विकास दादाराव हिंगे व इतर यांची मा. जिल्हा न्यायालय, लातूर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे ॲड. एस. एस. ढवण-पाटील यांनी काम पाहिले व त्यांना ॲड. इरफान सय्यद, ॲड. प्रकाश भुरे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!