जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
लातूर, दि. 03 :
राज्य निवडणूक आयागाच्या 23 सप्टेंबर, 2025, 10 ऑक्टोबर, 2025 आणि 27 ऑक्टोबर, 2025 रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबर, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
अंतिम छापील मतदार याद्या संबंधित तहसील कार्यालय येथे माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी या अंतिम याद्यांचे अवलोकन करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (समान्य प्रशासन) यांनी केले आहे.
