महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : माधवराव टाकळीकर
लातूर(9), प्रतिनिधी-
महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्याकडून पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे बिन बुडाचे आहेत. संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये केलेल्या निवडी या शासनाच्या निवड समितीमार्फत झाल्या असल्यामुळे या निवडीमध्ये संस्थेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नाही. असे संस्थेचे विद्यमान सचिव माधवराव टाकळीकर यांनी सांगितले आहे.
महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थे बाबतीत 9 नोव्हेंबर रोजी शिवशंकर मल्लिकार्जुन बिडवे आणि त्यांच्या सहका-यानी बिडवे लान्स येथे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये संस्थेच्या कार्यावर आरोप करण्यात आले आहेत.यातील सर्व आरोप बिन बुडाचे आहेत.
पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले सर्व मुद्दे न्यायप्रविष्ठ आहोत. त्यांनी स्वत:च ही प्रकरणे धर्मादाय आयुक्त, सह धर्मादाय आयुक्त, माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर येथे दाखल केली. ते सध्या न्यायप्रविष्ठ आहेत.
अशा प्रकरणाबाबत पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. त्यांनी संस्थेवर केलेले आरोप चुकीचे असून, बेकायदेशीर आहेत.ही सर्व प्रक्रिया त्यांचा कालावधी मध्ये घडलेली आहे. जे कांही शासन स्थरावरून चौकशी होईल त्याला आम्ही समोरे जाण्यास तयार आहोत. शासनाच्या व न्यायालयाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करण्यात आले आहे. संस्थेमध्ये झालेल्या निवडी या शासनाने नेमलेल्या समितीमार्फत झाल्या आहेत.
मा सर्वाच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये संस्थेच्या आज पर्यतच्या वादवर निर्णय देत पुनः नवीन कार्यकारणी बाबत कायदेशीर अधिकारी यांच्या नेमणुक करून निवड प्रक्रिया पार पाडली आहे.
निवडणुकी मध्ये पराभूत झाल्यामुळे न्यायालयात वारंवार दाद मागुनही त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी आता न्यायालयाने संस्थेवर निवडून दिलेल्या संचालक मंडळावर आरोप करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. जे या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यांच्या या कृतीविरुद्ध संस्था योग्य त्या न्यायालयात दाद मागेल. असे मत महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव माधवराव हणुमंतराव टाकळीकर यांनी व्यक्त केले आहे.
